मराठवाडा अजूनही दुष्काळाच्या छायेत

औरंगाबाद : वार्षिक सरासरीत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत मराठवाडयात फक्त ४० .५७ टक्के इतकाच पाऊस झाला असून, ऑगस्ट महिना संपत आला तरीही मराठवाड्यात पाऊस झालेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूराने थैमान घातले, मात्र मराठवाडा, अजूनही दुष्काळाच्या छायेत आहे.

पावसाचे दोन महिने संपले, पण मराठवाडयात सरासरी इतकाही पाऊस अजून झालेला नाही. सारी पिके करपून गेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्याचप्रमाणे, कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात १० टक्क्यांनी पेरणीचे प्रमाण कमी झाले आहे. तब्बल ४३ हजार जनावरे चारा छावण्यांत आहेत, तर विभागातील सर्व ८७२ पैकी बहुतांश प्रकल्पांत अजून जोत्याच्यावर पाणी आलेले नाही. मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद सह १०३७ गावे व १७१ वाड्या १३२३ टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. विभागातील लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.५० टक्क्यांच्या आसपास, ११ मोठ्या प्रकल्पांत ०.६२ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात ३ टक्के, ७४९ लघुप्रकल्पांत दीड टक्का पाणी आहे. जायकवाडी धरण भरले आहे, एवढीच समाधानाची बाब आहे.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत मराठवाड्यात फक्त ४०.५७ टक्के पाऊस झाला. विभागाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. आहे. ५०९.४६ मि.मी. पाऊस आजवर होणे अपेक्षित होते, ३१६.६७ मि.मी. इतका पाऊस विभागात आजवर झालेला आहे. १९२ मि.मी. पावसाची विभागात तूट आहे.

दुष्काळामुळे पिकांनी मान टाकली. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे. १ जानेवारी ते २५ ऑगस्ट २०१९ पर्यंतच्या काळात विभागात ५६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ८१, जालन्यात ६५, परभणी जिल्ह्यात ५०, हिंगोलीत २४, नांदेड ७४, बीड १३१, लातूर ५८, उस्मानाबाद जिल्ह्यात ८१ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here