गुरुदत्त शुगर्सकडून प्रती टन ३,००१ रुपये दर : चेअरमन माधवराव घाटगे

 

कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्स यंदाच्या गळीत हंगाम, २०२३-२४ साठी एकरकमी विनाकपात ३००१ रुपये प्रती टन दर देणार आहे अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केली. कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाच्या मोळी पूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने नेहमीच शेतकरी केंद्रस्थानी ठेवून पारदर्शी कारभार केला आहे. हंगाम संपल्यानंतर सरकारच्या रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार दर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालक बबन चौगले यांनी स्वागत केले. चेअरमन माधवराव घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, संचालक मंडळासह मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सीईओ उदय पाटील व मुख्य शेती अधिकारी विजय जाधव यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. संचालक शिवाजीराव माने – देशमुख यांनी आभार मानले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, अशोकराव माने, विजय भोजे, रामचंद्र डांगे, नगरसेवक डॉ. अरविंद माने, राजवर्धन माने- देशमुख, मुकुंद गावडे, विजय औताडे, इक्बाल बैरागदार, भोला कागले, विठ्ठल घाटगे, सरपंच मंगला बिरणगे, प्रेमला आवटी, प्रकाश रायनाडे, सरपंच हर्षदा पाटील, वंदना पाटील, चंद्रकांत कांबळे, साहेबराव सांबळे, मयूर खोत, जालिंदर ठोमके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here