उत्तर प्रदेशात साखर कारखान्यांसह 66 कंपन्या करत आहेत प्रतिदिन 1,45,860 लीटर हॅन्ड सॅनिटाइजर चे उत्पादन

लखनऊ: चीनी मंडी
उत्तर प्रदेश सरकारने कोरोना विरोधात आपला संघर्ष अधिक तिव्र केला आहे, त्यासाठी सरकारने सॅनिटाइजर च्या उत्पादनाला गती दिली आहे. सॅनिटाइजर ची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी, यूपी सरकारने सॅनिटाइजर प्लांट स्थापण्यासाठी परवान्याची प्रक्रिया सुसह्य बनवली आहे. यामुळे 66 कंपन्यांनी राज्यात सॅनिटाइजर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत . वर्तमानात, या कंपन्या राज्यात प्रति दिन 1,45,860 लीटर पर्यंत सॅनिटाइजर तयार करत आहेत. येणाऱ्या दिवसात उत्पादन अधिक वाढण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 साखर कारखाने, 10 डिस्टलरी, 26 सॅनिटाइजर कंपन्या आणि सात इतर कंपन्या पूर्ण राज्यात सॅनिटाइजर तयार करत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भवानंतर, राज्यात आतापर्यंत जवळपास 5,03,700 लीटर सॅनिटाइजरचा पुरवठा करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात सॅनिटाइजर चे उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली, कारण अधिक तर सॅनिटाइजर कंपन्या गुजरात मध्ये स्थित आहेत जेथून यूपी मध्ये याचा पुरवठा होत होता. राज्य सरकार सॅनिटाइजर उद्योगाला गती देण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9,18,300 लीटर सॅनिटाइजर चे उत्पादन करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here