नवी दिल्ली : धामपूर साखर कारखान्याने अशोक कुमार गोयल यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.
गुरुवारी कंपनीने भारतीय शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, विजय कुमार गोयल यांनी अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर, अशोक कुमार गोयल यांची ४ मे २०२२ पासून अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
याबाबत नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, धामपूर साखर कारखान्याने व्यवस्थापकीय संचालक गौतम गोयल आणि पूर्णवेळ संचालक संदीप कुमार शर्मा यांच्या राजीनाम्याचीही माहिती शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने अक्षत कपूर यांची पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती केली आहे, असे स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.