महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019: 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ला निकाल

दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा येथे विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबरला होणार असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा यांनी सांगितले. तसेच निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर करणेत येणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागेवर निवडणुका लढविल्या जातील त्यामध्य प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि कॉंग्रेस हे पक्ष निवडणूक लढवत आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए ने भारतीय जनता पार्टी सोबत विजय मिळविला होता ज्यामध्ये 260 जागेपैकी 122 जागा या भारतीय जनता पार्टीला मिळाल्या होत्या आणि शिवसेनेने 282 जागेपैकी 63 जागेवर विजय मिळविला होता.

2014 साली झालेली निवडणूक ही ऑक्टोबर महिन्यात झाली होती, निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांनी बहुमत मिळाल्यामुळे सरकार स्थापन केले आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. पण अद्याप 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्र येणार की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here