रायपूर : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शुक्रवारी पुन्हा खरेदी केल्या जाणाऱ्या अतिरिक्त भातापासून जैव-इंधन उत्पादन करण्यासाठी इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, इथेनॉल प्लांट स्थापन करणे हे केंद्र आणि राज्य सरकारांसह शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. ते म्हणाले, जैव इंधन उत्पादनासाठी जवळपास ६० रुपये खर्च येईल. त्यामुळे जीवाश्म इंधनाची आयात घटणार आहे.
ते म्हणाले की, धान्य खरेदी आणि तांदूळ साठवणुकीने राज्यासह केंद्र सरकारचेही नुकसान होत आहे. बघेल यांनी सांगितले की, एफसीआय केंद्र सरकारचे नुकसान सोसते. तर राज्य सरकारला स्वतः नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. इथेनॉल प्लांट स्थापन केल्यास शेतकऱ्यांना भात आणि ऊसाला चांगला दर मिळू शकतो. ते म्हणाले की, इंधनाच्या किमतीमधील अनियंत्रित वाढ हा चिंतेचा मुद्दा आहे. त्यासाठी जैव इंधनॉल युनिटची स्थापना हा एकमेव पर्याय आहे.