शेतकर्‍यांनी साफ आणि स्वच्छ उसाचा पुरवठा करावा: डॉ. बनवारी लाल

पलवल: हरियाणा चे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी सोमवारी पलवल सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ केला. दरम्यान त्यांनी उस उत्पादन शेतकर्‍यांशी बोलताना सांगितले की, कारखान्यामध्ये स्वच्छ साफ उसाचा पुरवठा करावा जेणेकरुन रिकवरी चांगली होवू शकेल. यावेळी पलवल आमदार दीपक मंगला, हथीन आमदार प्रवीण डागर आदी उपस्थित होते.

सहकार मंत्री यांनी सांगितले की, गाळप हंगामादरम्यान शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये उस आणण्यासाठी शेतकर्‍यांना टोकन सुविधा सुरु करण्यात आली आहे. टोकन प्रणाली पूर्णपणे पारदर्शकपणे केली जाईल. जे शेतकरी कारखान्यामध्ये येवून कंप्यूटरच्या समोर आपले पंजीकरण करतील, त्याच शेतकर्‍याला टोकन दिले जाईल.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here