फिजी : साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वेक्षण

सुवा : फिजीमधील साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी Fiji National University (FNU) आणि Sugar Research Institute of Fiji (SRIF) यांच्यावतीने साखर उद्योगात एका सर्वेक्षणाला सरुवात करण्यात आली आहे. बा आणि लुतोका (Ba and Lautoka) मध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आणि उर्वरीत ३०० जणांच्या मुलाखती उत्तर विभागात केल्या जाणार आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घटत्या संख्येची कारणे शोधणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे. कारण, उत्पादक घटल्याने साखर उत्पादनही खालावले आहे.
FNU रिसर्च अँड इनोव्हेशनचे कुलगुरू प्रोफेसर रोलँड डे यांनी सांगितले की, सर्वेक्षण पूरर्ण झाल्यानंतर SRIF आणि FNU यांच्यावतीने आपल्या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत ते संशोधनातील प्राधान्यक्रमाला औपचारिक रुप देतील. फिजीतील साखर उद्योगासमोर येणाऱ्या प्रमुख मुद्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने संशोधन केले जाईल. सर्वेक्षणातून उद्योगासाठीच्या प्रमुख बाबींच्या सोडवणुकीबाबतही विचार होईल. SRIF चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो.सँटियागो महिमाराजा यांनी सांगितले की, आमच्याकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये ऊसाचे उच्च उत्पादन देणाऱ्या प्रजाती उपलब्ध असतानाही ऊस उत्पादनात लक्षणीय घसरण दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here