नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थिती शनिवारी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४९ वी बैठक झाली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि केंद्र सरकार आणि राज्यांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. बैठकीला केंद्र आणि राज्य सरकारचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अपिलीय न्यायाधिकरण आणि यंत्रणा स्थापन करण्याबाबत परिषदेत चर्चा करण्यात आली.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी सांगितले होते की, ऑनलाइन गेमिंग आणि जीएसटी अपील न्यायाधिकरणावरील मंत्र्यांच्या गटाचा बहुप्रतिक्षित अहवाल बैठकीत सादर करण्यात आला. यापूर्वी १७ डिसेंबर २०२२ रोजी जीएसटी परिषदेची ४८ वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली होती. मागील बैठकीत, जीएसटी कौन्सिलने भौतिक पुराव्यांच्या छेडछाडीसह तीन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे गुन्हेगारी ठरवण्याची शिफारस केली होती. एक जुलै २०१७ पासून देशात जीएसटी कर लागू करण्यात आला आहे.