साखर कारखानदारांनावर पाकिस्तान सरकारचा अंकुश

इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने ऊसाच्या कमतरतेबद्दल पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (पीएसएमए) केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ऊसाची कमी भासत नाही. याशिवाय, ४० किलो ऊसाची विक्री प्रती ३०० रुपये होत असल्याचा आक्षेपही चुकीचा असल्याचे सरकारने म्हटले आहे. पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने एक आठवड्यापूर्वी पंतप्रधानांना पत्र लिहून ऊसाची कमतरता भासत असल्याचा दावा केला होता.

पीएसएमएच्या पत्राला उत्तर देताना उद्योग व उत्पादन मंत्रालयाने म्हटले आहे की, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या बँक पावत्यांनुसार सरासरी ४० किलो ऊसाची खरेदी २२० रुपये दराने करण्यात आली आहे. अशीच स्थिती राहिल्यास साखर प्रति किलो १०० रुपयांपेक्षा अधिक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पाकिस्तान ऑफ फार्मस फाउंडेशनच्या अध्यक्षांनीही साखर कारखान्यांचे आरोप खोटे असल्याचे आणि कारखाने सरकारला ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेतील साखर क्षेत्राचे गैरव्यवस्थापन अशा आशयाचे मंत्रालयाचे हे पत्र महालेखा अधिकारी मुहम्मद यासिर इक्बाल यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्धीस दिले आहे. पंजाबमधील ऊस आयुक्तांनी प्रदेशातील पिकाची उपलब्धता निश्चीत करून हंगामाची सुरुवात केली होती असे यात म्हटले आहे. ८ ऑक्टोबर २०२० रोजी १२ साखर कारखान्याच्या मालकांनी उद्योग आणि उत्पादनमंत्री हमद अझर यांची भेट घेतली होती. साखर कारखाना संघटनेच्या विद्यमान अध्यक्षांनीही लवकर ऊस गाळपाच्या निर्णयाचे समर्थ केले होते. त्यामुळे ऊस पीक उपलब्ध नसल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here