मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

 

मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईतील जोरदार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण शहरात रेल्वे आणि बस सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. कुर्ला, चेंबूर, सायन, दादर आणि अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान खात्याने एक आणि २ जुलै रोजी शहरातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्टसह जारी केला आहे. मोसमातील पहिल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी अनेक सखल भागात पाणी साचल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हिंदमाता, परळ, काळाचौकी, हाजी अली, डॉकयार्ड रोड, गांधी मार्केट आणि वांद्रे या भागात अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक एकतर मंदावली किंवा बंद झाली. पाण्याची प्रचंड आवक आणि पुरामुळे बीएमसीने अंधेरी मेट्रो पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी बंद केली. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते. अनेक ठिकाणी लोक गुडघाभर पाण्यातून जाताना दिसत आहेत. अनेक वाहनचालक तासन तास वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अधिकृत आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत शहरात ११९.०९ मिमी पाऊस झाला. तर पश्चिम उपनगरात ७८.६९ मिमी आणि पूर्व उपनगरात ५८.४० मिमी पाऊस झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here