मुंबईमध्ये प्रचंड पाऊस , रस्त्यावर पाणीच पाणी, जनजीवन विस्कळीत

मुंबई: मुंबईमध्ये मंगळवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या प्रचंड मोठ्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहराची लाइफ लाईन लोकल ट्रेन च्या तीन सेवा ठप्प झाल्या आहेत. याप्रकारेच मुंबईतील बेस्ट सेवा देखील गडबडली आहे.

शहराच्या खालच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. पंप लावून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महानगरपालिके चे आयुक्त इकबाल चहल यांनी सर्व नागरीकांना फक्त आवश्यक कामासाठीच घराबाहेर जाण्याची विनंती केली आहे. हवामान विभागाने बुधवारी ही मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे.
कुलाबा हवामान विभागाचे उपसंचालक केएस होसालीकर यांच्या मते, कुलाबामध्ये 267.62 मिमी व सांताक्रुज मद्ये 273.7 मिमी पाऊस नोंदला गेला आहे. पनवेलमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. आगामी 24 तासात जोरात पाऊस होवू शकतो. मुंबई आणि ठाण्यामध्ये यलो अलर्ट व पालघरमध्ये रेड अलर्ड जारी केला आहे.

गेल्या रात्रीपासून सुरु असणार्‍या मोठ्या पावसामुळे अनेक भागात रेल्वे ट्रॅक पाण्यात बुडाले. यामुळे मुंबईमध्ये मध्य, हार्बर आणि पश्‍चिम लोकल रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे आज अत्यावश्यक सेवांमध्ये जाणारे सरकारी कर्मचारी आज कामावर जावू शकले नाहीत. मोठ्या पावसामुळे आज कोर्ट, सरकारी कार्यालयांमध्येही अवकाश जाहिर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी विविध परिसरांमध्ये पंप लावून पाणी काढण्याचे काम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here