होंडा २०२४ पर्यंत बाजारात फ्लेक्स फ्यूएल वाहन उतरवणार

नवी दिल्ली : भारतातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसई) २०२४ पर्यंत भारतीय बाजारात फ्लेक्स फ्यूएल वाहन लाँच करण्याची योजना तयार केली आहे. बिझनेस टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष आत्सुशी ओगाटा यांनी सांगितले की, फ्लेक्स फ्युएल वाहन लॉन्च करण्यामध्ये इथेनॉल जैव इंधन मुख्य औद्योगिक घटक असेल. कारण भारताकडे पुरेसा ऊस आहे. जर जैव इंधनामध्ये याचे परिवर्तन केले गेले तर ते फायदेशीर ठरेल. ते म्हणाले की, आमच्याकडे ब्राझील आणि इतर देशांमध्ये फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या तंत्राबाबत अनुभवही आहे. ओगाटा म्हणाले की, केंद्र सरकारने जवळपास एक वर्षापूर्वी अधिकृतरित्या आपल्या जैव इंधनाच्या रोडमॅपची घोषणा केली होती. आणि त्या अनुषंगाने हळू हळू फ्लेक्स इंधनाच्या प्रकारात कंपनी आपल्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ विस्तारेल.

ते म्हणाले की, जर सरकार टॅक्स अथवा जीएसटी कपातीसारख्या काही प्रोत्साहनांसह जैव इंधन उद्योगाच्या समर्थनासाठी प्रयत्न केले तर या क्षेत्राला हे मोठे प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले की, फ्लेक्स इंधनाचा वापर सरकार आणि उद्योगाच्या समर्थनामुळे ब्राझीलमध्ये यशस्वी झाला आहे. ग्राहकांनी किमतींमुळे जैव इंधनाचा स्वीकार केला आहे. ते म्हणाले की, पुढील मार्च महिन्यात एचएमएसआय फ्लेक्स इंधन प्रोटोटाइपवर सादरीकरण करेल. भारत सरकारच्या धोरणानुसार यातून कृषी विभागाला बळ मिळणार आहे, सवलतीच्या एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये आमची धोरणे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुरुप आहेत. २०२४ च्या अखेरीस होंडा मोटर फ्लेक्स इंधन बाजारात उतरवेल. आम्ही फ्लेक्स फ्युएल मॉडेल पोर्टफोलिओचा टप्प्याटप्प्याने विस्तार करू. आम्ही सरकारसोबत याविषयी गांभीर्याने चर्चा करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here