रमाला साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस सर्वेक्षणाची पाहणी

बागपत : रमाला सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जीपीएसद्वारे उसाचे सर्वेक्षण सुरू आहे. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर. बी. राम यांनी या सर्व्हेची पाहणी करुन शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व्हे करणाऱ्या पथकांना कामात गती आणण्याचे निर्देश दिले.

रमाला सहकारी साखर कारखान्याच्या उसाचे सर्वेक्षण गतीने सुरू आहे. जीपीएस सिस्टमने हे काम सुरू असून ककडीपूर आणि किरठल येथील शेतकरी सुधीर मेलाराम, रामबहादूर, विजय लक्ष्मी, रेश्मा देवी आदींच्या शेतात सुरू असलेल्या सर्व्हेवेळी तेथे व्यवस्थापक आर. बी. राम पोहोचले. त्यांनी नोंदणी रजिस्टरची पडताळणी केली. त्यासोबतच जीपीएस मशीनद्वारे सुरू असलेल्या सर्व्हेनंतर शेतकऱ्यांना पावती उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उपस्थित राहून सर्व्हे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पर्यवेक्षक प्रमोद आणि गौरव यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली. या कामात बेफिकीरी होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी मुख्य ऊस अधिकारी अजय यादव, सुमीत आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्ह्यात ३२.२१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. मलकपूर कारखान्याने १६.४८ लाख क्विंटल, रमाला कारखान्याने १०.६७ लाख क्विंटल आणि बागपत कारखान्याने ५.०६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्यांनी ४.२० कोटी क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्यावेळपेक्षा ८ लाख क्विंटल अधिक ऊसाचे गाळप झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here