नूर-सुल्तान : देशांतर्गत बाजारपेठेत देशात उत्पादित झालेल्या साखरेचा पुरवठा ७ टक्क्यांवरुन वाढवून ४३ टक्के केल्यास साखर आयात ३२ टक्क्यांनी कमी होईल, असे कझाकिस्तानचे कृषी मंत्री येरबोल करशुकेयेव्ह यांनी सांगितले. त्यांनी सरकारी बैठकीत सांगितले की, कझाकिस्तानमध्ये साखरेचा वार्षिक खप सुमारे ५,३२,०० टन आहे. त्यापैकी फक्त ७ टक्के उत्पादन देशात होते. सिंचनासाठी पाण्याची कमतरता, बिटच्या उत्पादनाची पद्धती, त्यासाठीचे श्रम, साखर कारखान्यांची खराब अवस्था, रशियातील उत्पादकांकडील किंमत यामुळे साखर उत्पादन कमी होत असल्याचे ते म्हणाले.
कृषी मंत्र्यांनी सांगितले की, पाण्याच्या उपलब्धतेची समस्या दूर करुन बिटचे उत्पादन ३,३२,००० टनावरुन वाढवून १.८ मिलियन टन करण्याची अपेक्षा आहे. शेती क्षेत्राचा १४,५०० हेक्टरवरुन ३८,००० हेक्टरपर्यंत विस्तार, तांत्रिक उपकरणे, यासोबतच योजनांचे लाँचिंग करून उद्योगाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी साखर कारखान्यांचे अद्ययावतीकरण आणि नवनिर्मिती विचाराधीन आहे. त्यातून साखर उत्पादन २,५४,००० टनापर्यंत, सात पट वाढवून साखर आयात ३२ टक्क्यांनी घटविण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.