कुर्दिस्तान: साखर कारखान्यामुळे सुमारे ८००० जणांना रोजगार संधी मिळेल

इर्बिल : कुर्दिस्तानचे उप पंतप्रधान कुबाद तलबानी यांनी गुरुवारी रानिया येथे एका साखर कारखान्याच्या कोनशीलेचे अनावरण केले. हा साखर कारखाना सुमारे ८००० रोजगार संधी उपलब्ध करून देईल. दररोज किमान ५०० टन साखर उत्पादन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तलबानी यांनी या योजनेचे कौतुक करताना सांगितले की, ही भविष्यासाठी एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. आम्हाला यातून अशा उंचीवर जाता येईल, जिथे आमचे गुंतवणूकदार नियोजित उद्योगांवर लक्ष केंद्रीत करू शकतो असा मला विश्वास वाटतो. आम्ही एका उज्ज्वल भविष्याकडे जात आहोत असे तलबानी म्हणाले.
तलबानी म्हणाले, शेती क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणे आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे या दोन बाबींना आमचे प्राधान्य आहे. या साखर कारखान्यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरुपात आठ हजार जणांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय यातून कृषी क्षेत्राचा विकास होईल. कुर्दिस्तान सरकार शेती क्षेत्रावर अधिक भर देत आहे. त्यातून आपल्या अर्थव्यवस्थेत विविधता आणणे आणि तेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.

कृषी मंत्री बेगार्ड तलबानी म्हणाले, आम्ही कृषी क्षेत्रावरील अर्थव्यवस्थेचा पाया रचत आहोत. आमच्या देशाच्या उत्पन्नाचा तो स्रोत्र बनला पाहिजे. सध्याच्या सरकारने कृषी गुंतवणूकीवर अधिक भर दिला आहे. बाजारातील विक्रीसाठी अधिक देशांतर्गत उत्पादनांवर आमचे लक्ष राहील. खूप गोड साखरेसाठी कुर्दिस्तानमध्ये साखरेचा खप अधिक होतो. त्यासाठी साखर आयात केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here