मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नॅचरल शुगर ने दिला 33 लाखचा निधी

175

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड नलाईड इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 33 लाख 11 हजार 771 रुपयांचा निधी देण्यात आला. कारोनाग्रस्तांसाठी लागणारी औषधे व साहित्य खरेदी, तसेच गरजूंसाठी उपयायोजना करण्यासाठी हा निधी कारखान्याचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी बोलताना ठोंबरे म्हणाले, या साथीच्या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही नॅचरल शुगरच्या माध्यमातून आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. याप्रमाणे राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आर्थिक मदत केल्यास साखर उद्योगातून शंभर कोटींची मदत जमा होईल. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही ठोंबरे यांनी साखर उद्योजकांना केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here