ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे इथेनॉल प्लांट बंद करण्याचा क्रॉपनर्जीचा निर्णय

87

जर्मनातील जैवइंधन क्षेत्रातील कंपनी क्रॉपनर्जी (Cropenergies) ने कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि ऊर्जेसाठी वाढलेला खर्च लक्षात घेता काही इथेनॉल प्लांटमधील उत्पादन कमी करणे अथवा तात्पुरते प्लांट बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे. युरोपातील साखर क्षेत्रातील सर्वात मोठी रिफायनरी कंपनी स्यूडज़ुकरची (Suedzucker) उपकंपनी असलेल्या क्रॉपनर्जीने नैसर्गिक वायू तसेच ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा प्लांटच्या नफ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. आगामी काळात विल्टन-ब्रिटनमधील प्लांटवर अधिक लक्ष केंद्रित करेल. वार्षिक ४,००,००० क्युबिक मिटर उत्पादन क्षमतेचा हा इथेनॉल प्लांट २०२३ पासून कामकाज थांबवू शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले

बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये ब्राझील तसेच अमेरिकेतून जास्त इथेनॉल आयात केल्याने जैवइंधन विक्रीच्या किमती कमी झाल्या आहेत. पेट्रोलवरील करात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्यानंतर ब्राझीलमधून आयात केलेल्या इथेनॉलच्या किमती घसरल्या आहेत.  इथेनॉल मार्केट, ऊर्जा आणि कच्च्या मालाची स्थिती याचा आढावा आगामी आठवड्यात घेतला जाईल. त्यानंतर उत्पादन क्षमता कमी करणे अथवा उत्पादन तात्पुरते थांबवणे या उपायांबाबत निर्णय घेतला जाईल असे क्रॉपनर्जीने म्हटले आहे. कंपनीने १.४७ अब्ज युरो ते १.५७ अब्ज युरो यांदरम्यान महसूल मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here