साखर कारखान्याकडून सरकारी कार्यालये सॅनिटाइज

बहराइच(उत्तरप्रदेश) :जागतिक आजार कोरोनापासून निपटण्यासाठी पारले साखर कारखाना सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांबरोबर गावेदेखील कारखान्याकडून सॅनिटायज केली जात आहेत. कारखान्याचे सहाय्यक उस अधिकारी प्रमोद कुमार म्हणाले की, बुधवारी जिल्हाधिकारी परिसर, कपूरथाला, डीएम आवास, डीएम कॉलनी, तसेच सहसिलदार कार्यालय सॅनिटाइज करण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक गावे, शाळा, चिकित्सालये, ठाणी शिफ्टप्रमाणे सॅनिटाइज केले जात आहे. त्यांनी सांगितले की, कोविड 19 च्या लढाईमध्ये कारखाना व्यवस्थापन हरप्रकारे सहकार्य करत राहील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here