महाराष्ट्रात साखर उत्पादन ०.५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

 

पुणे चीनी मंडी

उसावर आलेल्या पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि राज्यातील काही भागांत असलेली दुष्काळी परिस्थिती यांमुळे यंदाच्या हंगामात महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ०.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) या संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात १०१ लाख टन साखर उत्पादन होईल. गेल्या हंगामात राज्यात १०७ लाख टन उत्पादन झाले होते. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतरचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य आहे. उत्तर प्रदेशात यंदा ११६ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने महाराष्ट्रात यंदा ९५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

या संदर्भात एआयएसटीए संघटनेचे प्रफुल्ल विठलानी म्हणाले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांतून १०१ लाख टन साखर तयार होण्याची अपेक्षा असून, त्यानुसार देशाचे एकूण साखर उत्पादन ३१५ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने ३०७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. एआयएसटीएने संघटनेने त्यापेक्षा जास्त उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.

सरकारने २९ रुपये प्रति किलो, अशी किमान विक्री किंमत निश्चित करण्याबरोबर प्रति टन एक हजार रुपये वाहतूक अनुदान आणि ऊस उत्पादकांना १३८ रुपये प्रति टन अनुदान अशी तरतूद केली आहे. यासाठी सरकारला ५ हजार ५३८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्याचबरोबर सरकारने ५० लाख टन निर्यात कोटा निश्चित केला आहे. या संदर्भात इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने व्यक्त केलेल्या अंदाजनानुसार सध्याच्या स्थितीत भारतातून ३० ते ३५ लाख टन साखर निर्यात होऊ शकेल. त्याचबरोबर दिलेल्या कोट्यानुसार साखरेची निर्यात न करू शकलेल्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाईची घोषणाही सरकारने केली आहे. एआयएसटीएने मात्र ३० लाख टन साखर निर्यात होऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here