तामीळनाडू : साखर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्याचा आग्रह

मदुराई : भीषण दु्ष्काळामुळे ऊस उत्पादन बंद केल्याच्या दोन वर्षानंतर अलंगनल्लूर येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शेतकऱ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने आपल्या कार्यक्षेातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात उसाची लावण करण्याचा आग्रह केला आहे. किमान ५,००० एकर ऊस उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

याबाबत द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तामिळनाडू ऊस उत्पादक शेतकरी संघाचे (Tamil Nadu sugarcane farmers association) के अध्यक्ष एन. पलानीसामी यांनी सांगितले की,हा कारखाना दुष्काळामुळे नव्हे तर अधिकाऱ्यांच्या गैर व्यवस्थापनामुळे बंद पडला आहे. गेल्या दोन वर्षात या कारखान्याला नोंदणी केलेला ऊस शेजारील इतर कारखान्यांना पाठविण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले.

पलानीसामी यांनी सांगितले की, कारखान्याचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी सातत्याने निदर्शने करीत आहेत. फेब्रुारी महिन्यात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ४६ दिवस कारखान्यात धरणे आंदोलन केले होते. ते म्हणाले, आम्ही अनेक प्रकारे कारखान्याला पाठबळ देण्यास तयार आहोत. आमच्या शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी आधीच १७५२ एकर ऊसाची नोंदणी केली आहे. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक वसंतराजन यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार कारखाना गाळपासाठी तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत दिली जाईल. कार्यकारी संचालकांनी ऊस मशीन तोडणीसाठी ४.५ फूट अंतराने उसाची लावण करावी असे निर्देश दिले आहेत. तसे केल्यास तोडणी शुल्कात बचत होईल आणि उत्पादनही अधिक मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here