पानीपत कारखान्याची साखर साठवणुकीची समस्या सुटणार, नवे गोदाम उभारणार

पानीपत : पानीपत साखर कारखान्यातील समस्या लवकरात लवकर सुटणार आहे. कारखान्यातील साखर साठवणुकीची समस्या सोडविण्यासाठी गोडावून आणि रस साठवणुकीसाठी टँकची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडे ११.२५ कोटी रुपयांचे इस्टिमेट पाठविण्यात आले आहे. व्यवस्थापनाकडे अतिरिक्त गोडावून आणि टँकची सोय झाल्यास साठवणुकीची समस्या दूर होणार आहे.

याबाबत जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, साखर कारखान्याकडे सध्या गोदाम आणि स्टोरेजची समस्या आहे. गाळपासाठी गोदाम आणि टँक नाही. हंगामादरम्यान रस आणि साखरेची विक्री कमी करण्यासाठी गोदामाची गरज भासते. नवे गोदाम आणि टँकची निर्मिती केल्यानंतर प्रशासनाला फायदा होणार आहे. आताही साखर कारखान्याकडे ४ लाख पोती म्हणजे २ लाख क्विंटल साखर आणि ६० हजार क्विंटल शीरा साठवणुकीची व्यवस्था आहे. तर हंगामात ७.५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले जाते.

साखर कारखान्यात डिस्टिलरीची निर्मितीही होणार आहे. परिसरातून जाणाऱ्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांना शिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अतिउच्च दाबाचा वाहिनी शिफ्ट होताच डिस्टिलरीच्या निर्मितीस गती येईल. साठवणुकीची समस्या सुटल्यास कारखाना व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, हंगामात ७.५ लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात येते. साखर आणि शीरा ठेवण्यासाठी ६.५ कोटी रुपये खर्चून गोदाम व ४.७० कोटी खर्चून टँकचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. एका महिन्यात यास मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पुढील हंगामापूर्वी याची उभारणी होईल, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here