त्रिवेणी इंजिनीअरिंगची साखर, ट्रान्समिशन व्यवसायात २१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना

नवी दिल्ली : गेल्या १८ महिन्यांमध्ये आपली इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट केल्यानंतर त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रिजने आता आपल्या साखर आणि ट्रान्समिशन व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी २१० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना तयार केली आहे.

द इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, त्रिवेणी इंजिनीअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक तरुण साहनी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशमधील खतौली, देवबंद, साबितगाढमध्ये कंपनीच्या तीन साखर युनिटच्या आधुनिकीकरणासाठी १३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. ही कंपनी फार्मा शुगरसाठी आपली क्षमता दुप्पट करण्यास मदत करेल. यातून रिफाईंड शुगरमधील एक महत्त्वपूर्ण, प्रिमियम पूर्ण होईल. या गुंतवणुकीमुळे कंपनीला आपल्या एकूण उत्पादनात रिफाईंड साखरेतील हिस्सेदारी ४० टक्क्यावरून ६० टक्क्यांवर नेण्यास मदत मिळणार आहे.

त्यांनी सांगितले की, कंपनी वीज वहन व्यवसायात आधुनिकीकरण, विस्तार आणि मशीनरीच्या खरेदीसाठी ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. कंपनीने आर्थिक वर्ष २२ मध्ये वीज वहन (ट्रान्समिशन) व्यवसायात आतापर्यंत आपला उच्चांकी वार्षिक महसूल मिळवला आहे. आणि नफ्यात ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. या नव्या गुंतवणुकीमुळे ही गती कायम राहण्यास मदत होईल. ३१ मार्चपर्यंत या व्यवसायात २२१ कोटी रुपयांची ऑर्डर बुकिंग केली आहे.

त्रिवेणीने या महिन्याच्या सुरुवातीला ३५० कोटी रुपयांच्या आपल्या गुंतवणुकीपासून आपली इथेनॉल उत्पादन क्षमता ३२० किलो लीटर प्रती दिनपासून वाढवून ती ५२० KLPD केली आहे. दोन सध्याच्या विस्तार योजना पूर्ण झाल्यानंतर कंपनी पुढील महिन्यापर्यंत आपली उत्पादन क्षमता ६६० KLPD पर्यंत नेणार आहे. इथेनॉल उत्पादकांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण वाढविण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे प्रोत्साहित होवून आपली उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी गती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here