कोल्हापूर : पुण्याच्या छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांनी केली क्षारपडमुक्तीच्या ‘दत्त पॅटर्न’ची पाहणी

कोल्हापूर : भवानीनगर (इंदापूर, जि. पुणे) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने नुकतीच शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याला अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली. दत्त कारखान्याने राबवलेला क्षारपडमुक्तीसाठी राबविलेला जमीन सुधारणा प्रकल्प आणि सुपर केन नर्सरीची त्यांनी पाहणी केली. सहकारी साखर कारखाना क्षेत्रात आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दत्त कारखान्याच्या या पथदर्शी तंत्रज्ञानाची माहिती घेऊन संचालकांनी हे तंत्रज्ञान आता इंदापूर तालुक्यात राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दौऱ्यात छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, पृथ्वीराज घोलप, नीलेश टिळेकर, श्रीशैल हेगाण्णा, कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक उपस्थित होते. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील यांनी स्वागत केले. त्यांनी कारखान्याचे एकरी १५० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट आणि सेंद्रिय कर्ब वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. संचालक मंडळाने कवठेगुलंद आणि गौरवाड येथील सुधारित जमिनींची संचालकांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेचे विशेष कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here