नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सोमवारी नवीन आठवड्याची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स २९४.८५ अंकांनी (०.३७ टक्के) वाढून ८०,७९६.८४ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ११४.४५ अंकांनी (०.४७ टक्के) वाढून २४,४६१.१५ अंकांवर बंद झाला. सोमवारी बहुतेक सर्व निर्देशांक सकारात्मक होते. निफ्टी ऑटो आणि तेल आणि वायू निर्देशांक सर्वाधिक वाढले.भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील घडामोडी आणि प्रमुख सूचीबद्ध कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कमाईचा आगामी काळात शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळू शकतो. यूएस सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण बैठकीतील निर्णयाचाही जागतिक स्तरावर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले कि, डॉलर कमकुवत झाल्याने आणि तेलाच्या किमतीत घट झाल्याने ‘एफआयआय’च्या भावना सकारात्मक झाली आहे. आशिका इन्स्टिट्यूशनल इक्विटीचे तांत्रिक आणि डेरिव्हेटिव्ह्ज विश्लेषक सुंदर केवट म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. ज्यामुळे त्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे.ट्रम्प यांनी भारतासह डझनभर देशांवरील परस्पर शुल्क ९० दिवसांसाठी थांबवण्याच्या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजार निर्देशांकांमध्ये तेजी दिसून येत आहे. (एएनआय)