किसुमु (केनिया ) : येथील किबोस शुगर अॅन्ड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड काही दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली. या कारखान्यात 10,000 टन पेक्षा अधिक ऊस पडून आहे. केनिया च्या राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरण (नेमा) ने स्थानिक किबोस नदी प्रदूषित करणे आणि आसपासच्या परिसरात प्रदूषण करण्याच्या आरोपात या कारखान्याला बंद करण्याचा आदेश दिला होता.
कारखान्याच्या 9 अधिकार्यांनी किसुम चे गर्व्हनर प्रा. अन्यांग न्याओंगे आणि नेमा चे क्षेंत्रीय कार्यालय किसुमू शुगर बेल्ट कॉरपोरेटीव यूनीयन ला एक निवेदन सुपुर्द करुन सरकारकडून कारखाना पुन्हा चालू करण्याची अनुमती मागितली आहे. कारखाना अधिक़ार्यांचे म्हणणे आहे की, कारखान्यात 10,000 टन ऊस बेकार पडलेला आहे. तसेच शेतामधूनही 3 लाख ऊसाची तोडणी होणे बाकी आहे. यामुळे कारखाना पुन्हा चालू व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी काही लोकांनी नेमा च्या आदेशांना एक राजकीय पाउल असल्याचे सांगून किसुमू च्या रस्त्यांवर शांततापुर्ण आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांचे असे म्हणणे होते की, कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी आणि कर्मचार्यांचे नुकसान होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.











