नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन आघाडीचे प्राथमिक सदस्य म्हणून भारतासोबत एकत्र येण्यास १९ देशांनी सहमती दर्शवली आहे.
याबाबत तेल मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात नमूद केले आहे की, जागतिक जैवइंधन युतीचे खरे यश हे सरकारी प्रकल्पातून लोकसहभागाच्या प्रकल्पाकडे नेण्यावर अवलंबून असेल.
अमेरिकन ऊर्जा सचिव जेनिफर ग्रानहोम यांनी याआघाडीची स्थापना जैवइंधन उत्पादनांच्या निर्मिती प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखली गेली आहे,. त्याचे उद्दिष्ट टेस्ट ट्यूबपासून टेस्ट ड्राइव्हकडे आणि फील्डमधून इंधनाकडे अशा स्वरुपाचे आहे, अते मत व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे.












