कोल्हापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि संचालकासह 28 जणांना कोल्हापूर येथील न्यायालयाने फौजदारी खटल्याअन्वये हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. कोल्हापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. ए. व्यास यांच्या न्यायालयाने हे समन्स जारी केले असून कोल्हापूर येथील न्यायालयात सहा जुलै रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए. ए. व्यास यांनी जाहीर केलेल्या या समन्समध्ये कल्याणराव काळे यांच्यासह 28 जणांना संक्षिप्त फौजदारी खटला 44 10 अन्वये ही नोटीस बजावली आहे. फौजदारी कलम 200 अन्वये गुन्ह्याबाबत जबाब देण्यासाठी या सर्वांना पाचारण करण्यात येत आहे. जेके शुगर्स अँड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने हेमंत जितेंद्र शहा हे या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत.
चेअरमन काळे आणि संचालकांच्या व्यतिरिक्त कार्यकारी संचालक, फायनान्स ऑफिसर, शुगर अकाउंटंट, डेप्युटी अकाउंटंट या सर्वांना ही समन्स बजावण्यात आले आहे. या समन्समध्ये पुढील 28 जणांची नावे आहेत. कल्याण वसंतराव काळे, झुंझार लक्ष्मण असबे, राजेंद्र भगवान शिंदे, श्रीमती. मालनबाई वसंतराव काळे, मोहन वसंत नागटिळक, गोरख हरीबा जाधव, बाळासाहेब उर्फ बाळासो सदाशिव कौलगे, बिभिषण दादाराव पवार, भारत सोपान कोळेकर, आण्णा गोरख शिंदे, राजाराम खासेराव पाटील, दिनकर नारायण कदम, दिनकर आदिनाथ चव्हाण, तानाजी उमराव उर्फ रावसाहेब सरदार, विलास मुरलीधर जगदाळे, सुधाकर मारुती कवडे, प्रदिप गोरख निर्मल, योगेश दगडू ताड, युवराज छगन दगडे, इब्राहीम कोंडाजी मुजावर, सौ. वत्सला मारुती भोसले, सौ. पुष्पा अरुण बंगळ, नागेश एकनाथ फाटे, बबन सदाशिव सोनवळे, रविंद्र हणुमंत धुळे, लक्ष्मण ज्ञानेश्वर इंगोळे, नवनाथ वसंत कौलगे.











