ढाका: जपानच्या तांत्रिक पाठिंब्याने बांगलादेशने स्वत:चा मोटर ब्रँड तयार करण्याची योजना बनवली असल्याचे उद्योगमंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूंनी सोमवारी सांगितले. प्रगती इंडस्ट्रीज लिमिटेड ही सरकारी कंपनी असून जपानच्या मित्सुबिशी कॉर्पोरेशनच्या तांत्रिक सहकार्याने मोटार वाहने तयार करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. एवढेच नव्हे तर बांगलादेशच्या साखर कारखान्यांमध्ये तांत्रिक सुधारणा करण्याची योजना आहे. मंत्रालयात जपानचे राजदूत नाओकी इतो यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर उद्योगमंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूं बोलत होते.
मंत्र्यांनी सरकारी मालकीच्या साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण, कृषी आधारित उद्योगांची उभारणी, कृषी उत्पादने व खाद्यपदार्थांची प्रक्रिया, हलक्या अभियांत्रिकी उद्योगांचा विकास आणि लघु व मध्यम उद्योग विक्रेते यासाठी जपानी गुंतवणूकीची मागणी केली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.











