मुसळधार पावसामुळे झालेल्या ऊस पीकाच्या नुकसानीसाठी सरकारकडून पुरेशा भरपाईची मागणी

लखनऊ, उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशामध्ये ऊस शेतकरी आणि प्रलंबित थकबाकी हा मुद्दा आता राजकीय अजेंड्यावर आला आहे. प्रदेशातील सर्व राजकीय पक्ष, शेतकरी संघटना या मुद्यांवर योगी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसही ऊस शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राज्यातील ऊस विकास आणि साखर कारखाना मंत्री सुरेश राणा यांना निवेदन दिले की, मुसळधार पावसामुळे ऊसाच्या पीकाचे नुकसान झाले आहे. आणि यासाठी सरकारकडून शेतकर्‍यांना पुरेशी नुकसान भरपाई दिली जावी आणि साखर कारखान्यांना प्रलंबित ऊस थकबाकी भागवण्याचे निर्देश दिले जावेत.

मंत्री राणा यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात लल्लू यांनी सांगितले आहे की, राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसामुळे पाणी भरले आहे, त्यामुळे ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत प्रभावित शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणतेही आश्‍वासन देण्यात आलेले नाही. शेतकरी एकावेळी अनेक संकटांचा समाना करत आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यांनी पावसामुळे आपले पीक गमावले आहे, आणि त्यांना साखर कारखान्यांकडून त्यांचे पैसेही मिळत नाहीत. लल्लू पुढे म्हणाले की, राज्यामध्ये ऊस शेतकर्‍यांसाठी सात मुद्दे पत्रात मांडले आहेत. यामध्ये प्रमुख मुद्दे आहेत की, बंद साखर कारखान्यांना पुन्हा सुरु करावे, सरकारी सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, पीक विमा योजेनेच्या अंतर्गत ऊस पीकाचा समावेश करावा, ऊसाला 450 रुपये प्रति क्विंटल दर वाढवून द्यावा, आदी मुद्दयांचा समावेश करण्यात आला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here