तमिळनाडू: ऊस दर ४००० रुपये टन करण्याचे डीएमकेचे आश्वासन

चेन्‍नई : तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत डीएमकेने आपल्या जाहीरनाम्यात लोकांना रेशन धान्य दुकानांतून १ किलो साखर जादा देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय भाताचे किमान समर्थन मुल्य प्रति क्विंटल २०००रुपयांवरून २५०० रुपये तर उसाचा दर प्रतिटन ४००० रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे.

शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक घोषणा जाहीरनाम्यात आहेत असे सांगून डीएमके पार्टीचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन म्हणाले, आम्ही सत्तेवर आल्यावर तमिळनाडू विधानसभेत एक ठराव मंजूर करणार आहोत. त्यामध्ये केंद्र सरकारला तिन्ही कृषी कायदे परत घेण्याची विनंती केली जाईल. याशिवाय शेतीसाठी एक स्वतंत्र अर्थसंकल्पही मांडला जाईल.
कावेरी नदी खोऱ्याला संरक्षित शेती क्षेत्र म्हणून घोषणा करण्याची हमी देताना जाहीरनाम्यात म्हटले आहे की, कोळसा खाणी, मिथेन वायू उत्खनन, शेल गॅस प्रकल्प लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांनाही रोखले जाईल. शेती क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यातून शेतीमध्ये उत्पादकता सुधारणांसाठी शेतकरी संघटना तसेच तज्ज्ञांची चर्चा करून धोरण ठरवले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here