शिल्लक ऊस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांमध्ये टाकण्याचा भाकियूने दिला इशारा

चांदपूर: साखर कारखान्याने ऊस गाळप करण्याऐवजी शेतात उभा सोडल्याच्या कारणावरून भारतीय किसान युनीयनने ऊस कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर टाकण्याचा इशारा दिला आहे.

भाकीयूच्या जलीलपूर विभागातील कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये खूप ऊस शिल्लक आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चांदपूर विभागातील कोणत्याही साखर कारखान्याने, कोणत्याही ऊस खरेदी केंद्र अथवा कारखान्याच्या गेटवर उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतामध्ये तसाच सोडला तर आंदोलन केले जाईल. तो ऊस चांदपूर कारखान्याचे मुख्य सर व्यवस्थापक, ऊस विभागाचे महा व्यवस्थापक अशा बड्या अधिकाऱ्यांच्या घरात आणून टाकला जाईल. भाकियुने चांदपूर विभाग आणि इतर कारखान्यांच्या खरेदी केंद्रातील ऊस चांदपूरचे उप जिल्हाधिकारी, तहसिलदारांच्या निवासस्थानी आणून टाकण्याचाही इशारा दिला आहे.

भाकियुचे विभाग सचिव शीशपाल सिंह, चौधरी रामपाल सिंह, लुधियान सिंह, सरपंच रामफल, वरूण गुज्जर, अशोक कुमार, सुभाष कुमार, नरेंद्र सिंह, रामलाल प्रधान, उदयराज सिंह, नौवहार सिंह, कैलाश सिंह, वेदपाल सिंह, रोहिताश सिंह आदींनी हे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here