ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याची मागणी

बागपत : जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये ऊस आहे, तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवावेत अशी मागणी राष्ट्रीय लोकशाही दलाच्या कार्यकर्त्यानी उप जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाने केली. शेतकऱ्यांना तोडणी पावत्याही वेळेवर मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली.

विभागात उस वजन केला जात नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अनेक दिवस केंद्रांकडून ऊस खरेदी केली जात नसल्याने ऊस वाळून जात आहे. बहुतांश केंद्रांकडून ऊस उचल केला जात नाही. ही समस्या वाढल्याने रालोदच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ऊस संपेपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली. जर वेळवर ऊस तोडणी झाली नाही, पावत्या मिळाल्या नाहीत तर शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. आधीच कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितले. उप जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन दिले. यावेळी सोनू चौहान, ब्रह्मपाल सिंह मेंबर, जितेंद्र धामा, रामकुमार धामा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here