गयाना: साखर उद्योगाला अतिरिक्त १.५ बिलियन डॉलर मदतीचे स्वागत

जॉर्जटाऊन : गयाना अॅग्रीकल्चर अँड जनरल वर्कर्स युनियनने (जीएडब्ल्यूयू) साखर उद्योगासाठी १.५ बिलियन डॉलर देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गयाना अॅग्रीकल्चर अँड जनरल वर्कर्स युनियनने याबाबत एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नव्या सरकारने सुमारे दहा महिन्यांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर १.५ बिलियन डॉलरच्या मदतीसह साखर उद्योगाला एकूण १०.५ बिलियन डॉलरची मदत आतापर्यंत पुरवली आहे. सरकारने घेतलेले हे निर्णय ही खूप मोलाची बाब आहे.

साखर उद्योगासाठी हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. कारण हा उद्योग गुंतवणुकीपासून वंचित होता. गयाना अॅग्रिकल्चर अँड जनरल वर्कर्स युनियनने सांगितले की, जर साखर उद्योगाला आपला उत्पादन खर्च कमी करायचा असेल आणि उत्पन्न वाढवायचे असेल तर साखर कारखाने आणि ऊस उत्पादन क्षेत्रातील इतर घटकांना संघटित करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here