नवी दिल्ली : इथेनॉलच्या उत्पादनाता भारतात प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातून इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी केले जाणार आहे. यासोबतच इथेनॉल उद्योग, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला कशी मदत मिळू शकेल यावर काम केले जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने इथेनॉलवर आधारित फ्लेक्स इंजिनीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिने यासंबंधीच्या एका योजनेवर काम केले जाईल. ब्राझील, अमेरिका आणि कॅनडासारख्या जगातील इतर देशांमध्ये फ्लेक्स इंजिन आहेत, ते इथेनॉलवर चालतात असे गडकरी यांनी सांगितले. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, टोयाटो सारख्या वाहन निर्मात्यांना पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या विकासासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. स्थानिक रुपात उत्पादित झालेल्या इथेनॉलमुळे देशाला फायदा होईल. कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी होऊ शकेल. यासोबतच प्रदुषण कमी होईल आणि खर्चातही बचत होईल. एक लिटर इथेनॉलची किंमत ६०-६२ रुपये प्रती लिटर मिळेल तर पेट्रोल १०० रुपयांना मिळत आहे.
गडकरी यांनी इंडियन बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमात सांगितले की, अमेरिका, ब्राझील, कॅनडाकडे फ्लेक्स इंजिन आहे. आम्ही अशा पद्धतीच्या सुविधांसाठी पुढील तीन महिन्यात काम करणार आहोत. सरकारने आधीच १०० टक्के इथेनॉल पंप सुरू करण्यास मंजुरी दिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच पुण्यात अशा दोन केंद्रांचे उद्घाटन केले आहे. टीव्हीएस, बजाजसह निर्मात्या कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची निर्मिती केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link