नवी दिल्ली : अखेर दिल्ली-एनसीआरमध्ये दीर्घकाळानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली एनसीआरमध्ये तापमान घटले होते. हवामान विभागाने सकाळी मान्सूनची घोषणा करताना पुढील काही दिवसांपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
दरमयान, सकाळी पाऊस झाल्यानंतर दिल्लीच्या काही भागात पाणी साठल्याची स्थिती निर्माण झाली. जोरदार पावसानंतर दिल्लीमध्ये एनएच ९वर वाहतूक कोंडी झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर -दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली शिवाय एनसीआरमध्येही पाऊस सुरुच राहील. दिल्लीलगतच्या नोएडा आणि गाझियाबादमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुढील काही दिवसांत तेथे हलका पाऊस सुरू राहील अशी शक्यता आहे. पावसाचे ढग कायम राहतील अशी शक्यता आहे.
दरम्यान, पाऊस आणि थंड हवेमळे लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. पावसानंतर मथुरा रोडवर पाणी साठल्याने वाहतूक कोंडी झाली. दिल्लीच्या काही भागात लोकांना त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link











