नादेही साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट अथवा वीज प्रकल्पाची मागणी

जसपूर : भारतीय किसान युनियनच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत नादेही साखर कारखान्यात पॉवर प्लांट अथवा इथेनॉल प्लांट सुरू करण्याची मागणी करण्यात आली. भाकियूच्या सदस्यांनी कृषी उत्पादन समितीच्या प्रांगणात आयोजित या बैठकीनंतर उप जिल्हाधिकारी सुंदर सिंह यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून नादेही साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट अथवा वीज प्रकल्प सुरू करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. कारखआना सुरू करताना दोन्हीपैकी कोणताही एक प्लांट सुरू करणे आवश्यक आहे.

यापूर्वी भाताच्या पिकाचा सर्व्हे करून त्याचा अहवाल भात खरेदी केंद्रांकडे पाठविण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. शेतकरी विक्री केंद्रांवर होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारापासून स्वतःचा बचाव करू शकतील. शेतकऱ्यांची सिंचनाची अडचण दूर करण्यासाठी कालागड धरणाला भोगपूर आणि तुमडिया या धरणांशी जोडण्याची गरज आहे असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना प्रेम सहोता, शीतल सिंह बढवाल, मुख्तार सिंह, दिदार सिंह, जागीर सिंह, बलदेव सहोता, इंद्रपाल सिंह, चौधरी किशन सिंह आदी उपस्थित होते.
दरम्यान, खटीमा मंडई समितीच्या सभागृहातील बैठकीनंतर भाकियूने पाच मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी भाकियूचे विभाग अध्यक्ष गुरुसेवक सिंह, हरप्रीत सिंह, राकेश सिंह, गुरप्रीत सिंह, सुखपाल, प्रितपाल सिंह, बलजीत सिंह, जसविंदर सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here