नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. हिंदूस्थान टाईम्स डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गृहमंत्री पुढील महिन्यात पुण्याला येतील अशी शक्यता आहे.
केंद्र सरकारने अलीकडेच सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. शहा यांना पहिल्या केंद्रीय सहकार मंत्र्यांच्या रुपात निवडण्यात आले आहे. मंगळवारी पवार यांनी शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर ट्वीट करत त्यांनी भेटीची माहिती दिली. यामध्ये पवार यांनी सांगितले होते की, साखरेच्या एमएसपी आणि साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल युनिट स्थापन करण्याच्या दोन प्रमुख प्रश्नांबाबत त्यांची चर्चा झाली होती.
प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री शहा हे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेचा दौरा करणार आहेत. तेव्हा पवार यांनी त्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देण्याची विनंती केली आहे.
पवार यांनी मंगळवारी अमित शहा यांची भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्र्याच्या रुपात नियुक्तीबद्दल शहा यांचे अभिनंदन केले होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link