भारतीय साखर बाजारपेठेत तेजी; दरात ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलची वाढ

गेल्या दोन आठवड्यापासून देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दराने उसळी घेतली आहे. बाजारातील ट्रेंड सकारात्मक दिसत असून मागणीतही वाढ पहायला मिळत आहे. साखर कारखानदार नेहमीपेक्षा आधीच विक्री बंद करीत आहेत. हिंदू धर्मियांच्या श्रावण या महिन्याच्या सुरुवातीलाच ही स्थिती असून पुढील कालावधीत अनेक सण असल्याने स्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांतून सवलत मिळाल्याने नेहमीची साखरेची मागणी पूर्वस्थितीत आली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल अनलॉकसारखी स्थिती दिसून आली. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

चीनीमंडी न्यूजशी बोलताना कोल्हापूर स्थित प्रमुख शुगर ट्रेडिंग फर्म जे. के. एंटरप्रायजेसचे संचालक जीतूभाई के. शहा यांनी देशांतर्गत साखर बाजारपेठेच्या सद्यस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, एप्रिल २०२१, मे २०२१, जून २०२१ आणि जुलै २०२१ या कालावधीत विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेला कोटा २२ लाख टनाचा होता. मात्र, ऑगस्ट २०२१ साठी २१ लाख टनाचा कोटा मंजूर करण्यात आला. खरेतर सणांच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने २४ लाख टन कोटा मिळेल अशी बाजाराची अपेक्षा होती.

ते पुढे म्हणाले, कोटा कमी मंजूर झाल्याने बाजाराच्या मूडमध्ये बदल झाल्याचे दिसत आहे. देशभरातील बाजारांमध्ये मागणी वाढत असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) २९०० रुपये प्रती क्विंटल केल्यानंतर पहिल्यांदाच ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटल दरवाढ झाली आहे. ऑगस्टचा कोटा जाहीर केल्यानंतर १५ दिवसांतच महाराष्ट्रातील साखरेची विक्री ७५ ते ८० टक्के आणि उत्तर प्रदेशातील विक्री ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत झाली आहे. आणि बाजारात पुरवठ्याविषयी स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

जे. के. एंटरप्रायजेसच्या संचालकांच्या म्हणण्यानुसार, जर कोणत्याही हिंदू कॅलेंडरनुसार एखाद्या महिन्यात पाच मंगळवार आले आणि त्याआधीच्या महिन्यात बाजारात तेजी असेल तर पुढे मंदीची स्थिती येते अशी धारणा अनेक लोकांची आहे. यावेळी श्रावण महिन्यात साखरेच्या दरात वाढ पहायला मिळत आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्यात दरात घसरण झालेली दिसू शकते असेही अनेक लोकांचे म्हणणे आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here