महाराष्ट्राने घेतली मोठी भरारी, लसीकरणात सर्व राज्यांत अव्वल क्रमांक

देशभरात कोरोना लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे. २१ ऑक्टोबर रोजी भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला. आता महाराष्ट्रानेही यात महत्त्वपूर्ण भरारी गेतली आहे. महाराष्ट्राने ३ कोटी लसीकरण पूर्ण केल आहे. यासोबतच हा आकडा पूर्ण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य बनले आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वाधिक लसीकरण करणारे राज्य बनले आहे. महाराष्ट्राच्या लसीकरणाने देशातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक फैलाव महाराष्ट्रात झाला होता. त्याच्याशी लढा देऊन देशाने लसीकरणातही इतर राज्यांना पिछाडीवर टाकले आहे.

सध्या लसीकरणाची गती मंदावली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून राज्यंना १०७.२२ कोटी लसी देण्यात आल्या आहेत. या राज्यांकडे आता १२३७ कोटी कोरोना डोस असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. महाराष्ट्राने या अंतर्गत ३ कोटी लसीकरण पूर्ण करून मोठी मजल मारली आहे. आतापर्यंत देशात १,०२,९४,०१,११९ हून अधिक लसी देण्यात आल्या आहेत. तर युपीमध्ये आतापर्यंत १२.२१ कोटीहून अधिक डोस दिले आहेत. यापैकी २.७८ कोटी दुसरा डोस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here