गोवा : संजीवनी कारखान्याकडून ऊस उत्पादन, साखर उतारा वाढीचे प्रयत्न

फोंडा : ऊसाचे उत्पादन आणि उतारा वाढीसाठी संजीवनी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना तीन हायब्रीड व्हरायटीची बियाणी वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या पिक उत्पादनाच्या ९ टक्क्यांच्या तुलनेत हायब्रीड व्हरायटीचा उतारा ११-१२ टक्के आहे. कारखान्याने आगामी हंगामात ऊस उत्पादन वाढीवर नजर ठेवली आहे.

गोव्यातील या एकमेव साखर कारखान्याने महाराष्ट्रातील गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) मधून हायब्रिड व्हरायटी खरेदी केली आहे. शेतकऱ्यांना सुविधा समितीच्या माध्यमातून बियाणे वितरीत करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की, बियाणे वितरणासाठी तयार आहे. गोव्यात उसाचे उत्पादन ६०,००० टनावरुन घसरून ३०,००० टनावर आले आहे. कारखाना व्यवस्थापनाकडून ऊस उत्पादनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here