महाराष्ट्रातील रत्नागिरीत मध्यम तीव्रतेचा भूकंप

मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने यासंदर्भातील माहिती दिली आहे. भूकंपाची तिव्रता ४ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास ३५० किलोमीटर अंतरावर रत्नागिरी जिल्ह्यात पाच किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाल्याची नोंद यंत्रावर झाली आहे.

केंद्राच्या व्यवस्थापन प्रमुखांनी सांगितले की, भुकंप रात्री दोन वाजून ३६ मिनिटांनी झाला. या कालावधीत कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here