केप टाऊन : गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतील साखर उद्योग विविध आव्हानांचा सामना करत आहे. आणि शुगर मास्टर प्लॅन २०३० मधून यातील काही अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. साखर उद्योगाला चालना देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.
गेल्या २० वर्षांपासून देशांतर्गत साखर उत्पादनात जवळपास २.७५ मिलियनवरून २.१ मिलियन टन प्रती वर्ष २५ टक्के घसरण झाली आहे. यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ६० टक्क्यांनी घसरण झाली आहे. या उद्योगात ४५ टक्के नोकऱ्या कमी झाल्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका साखर संघाचे (एसएएसए) कार्यकारी संचालक ट्रिक्स त्रिकम यांनी सांगितले की दक्षिण आफ्रिकेत साखर उद्योग गंभीर आव्हानांचा मुकाबला करीत आहे. त्यामध्ये आरोग्य संवर्धन कराअंतर्गत लेव्हीचा मुद्दा, ईस्वातिनीकडून वाढलेले साखरेचे प्रमाण, समुद्रातील आयात, अपुरे दर आणि स्थानिक बाजारपेठ अशा सर्व घटकांचा समावेश यात आहे.
राष्ट्रीय आर्थिक विकास आणि श्रम परिषदेने नियुक्त केलेल्या एका स्वतंत्र आयोगाने केलेल्या मुल्यांकनानुसार लेवी साखरेच्या मागणीत घट झाली असल्याने जवळपास या उद्योगातील १०,००० नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. त्रिकम यांनी सांगितले की, एप्रिल २०१८ मध्ये प्रमोशन लेव्हीच्या सुरुवातीमुळे साखर उद्योगाचे १.२ अब्ज रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. साखर कर लागू झाल्याने दोन कारखाने बंद झाले आहेत. जे यापूर्वी आर्थिक तणावग्रस्त झाले होते. उद्योगाच्या मदतीसाठी मास्टर प्लॅन अत्यंत आवश्यक आहे असे त्रिकम यांनी सांगितले. यातून अडचणी तत्काळ सोडवल्या जाणार नसल्या तरी ते दीर्घकाळ फायद्याचे ठरेल.











