मुंबई : महाराष्ट्रात बुधवारी कोरोना व्हायरसच्या ओम्रॉकॉन व्हेरियंटचा विस्फोट झाला आहे. बुधवारी राज्यात एका दिवसात ८५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या २५२ झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात ३९०० कोरोना संक्रमित आढळले आहेत. वीस जणांचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. लोकांनी घाबरून जावू नये, थोडी सावधगिरी बाळगावी. यासोबतच नव्या वर्षाच्या स्वागताबाबत राज्यातील लोकांनी घरातच राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
दुसरीकडे मुंबईत कोविड टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार तिसरी लाट सुरू झाली आहे. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आला होत. त्यामुळे आता राज्य सरकार कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनःस्थितीत नाही. सरकारने मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२२ पर्यंत हे कलम लागू असेल. तर ३० डिसेंबर ते ७ जानेवारी २०२२ या काळात रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्टसह कोणत्याही खुल्या अथवा बंद जागेत नव्या वर्षाच्या स्वागताची पार्टी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही वाढत्या कोरोना संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.











