नवी दिल्ली : आयकर विभागाने सांगितले की, या आर्थिक वर्षात आतापर्यंत १.७९ कोटी करदात्यंना १.६२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रिफंड जारी केला आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १.४१ कोटी रिफंडचा यात समावेश आहे. तो २७,१११.४० कोटी रुपयांचा समावेश आहे. आयकर विभागाने याबाबत ट्वीट केले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) एक एप्रिल २०२१ ते २४ जानेवारी २०२२ पर्यंत १.७९ कोटी रुपयांपेक्षा अधिक करदात्यांना १,६२,४४८ कोटी रुपयांहून अधिक रिफंड जारी केले आहे.
जर तुमच्या खात्यामध्ये रिफंड आले नसेल तर खाते न जुळणे हे यासाठी कारणीभूत आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार समायोजन दोषामुळे तुमचे पैसे अडकले असतील. कलम २४५ अनुसार जर तुमचे अकाऊंट जुळत नसेल तर तुमचे पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचे रिफंड आले नसेल तर आयकर विभागाच्या खात्यावर स्टेटस तपासणी करता येते. पॅनकार्ड क्रमांक आणि लॉगइन आयडी, पासवर्ड घेऊन तु्म्ही हे काम करू शकता.












