रमाला कारखान्यात इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी पथकाकडून पाहणी

रमाला : दिल्लीहून आलेल्या एका पथकाने रमाला सहकारी साखर कारखान्याची पाहणी केली. या टीमने कारखाना परिसरात फिरुन इथेनॉल प्लांट, बायोगॅस प्लांट सुरू करण्याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. या पथकाकडून सरकारला एका आठवड्यात आपला अहवाल सादर केला जाणार आहे. इथेनॉल प्लांटच्या वृत्ताने शेतकऱ्यांमध्ये खुशीची लाट पसरली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृ्त्तानुसार, नवी दिल्लीतील नॅशनल फेडरेशनचे पथक येथे पोहोचले. फेडरेशनचे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. प्रकाश नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रमाला साखर कारखान्याची पाहणी केली. पथकाचे प्रमुख सदस्य केव्हीएन सेठी, अर्थ सल्लागार सुमित झा, सचिव मुरलीधर चौधरी, तंत्र सल्लागार ए. के. श्रीवास्तव, सहायक सचिव अंजू खुराना आदींनी मशीनरीची पाहणी केली. कारखान्याचे गोदाम आणि परिसर पाहिला. त्यानंतर आसपासच्या शेतामधील माती तपासण्यात आली. कारखान्यात इथेनॉल प्लांट आणि बायोगॅस प्लांटबाबत प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापक आर. बी. राम, उत्तर प्रदेश सहकारी साखर संघ, लखनौचे कार्यकारी संचालक सुनील आहरी, मुख्य अभियंता डी. के. द्विवेदी, उप व्यवस्थापक जी. के. पोद्दार, मुख्य ऊस अधिकारी अजय यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here