मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर ऊस संशोधन केंद्राचे संशोधक, ऊस विभाग आणि साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. शेतामध्ये ऊसावर पसरलेल्या टॉप बोरर व अन्य किड रोगांपासून पिकाला कसे वाचवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. देहात विभागात ऊसावर या किडीसह इतर रोगांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊस संशोधन केंद्राचे संयुक्त संचालक डॉ. वीरेश सिंह, किटक तज्ज्ञ डॉ. निलम, जिल्हा ऊस अधिकारी डॉ. आर. डी. द्विवेदी, खांडसरी अधिकारी चंद्रशेखर सिंह, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक संजय कुमार, बृजेश कुमार राय, बुढाना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राज सिंह चौधरी, महाव्यवस्थापक देवेंद्र सिंह आदी उपस्थित होते.
दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या पथकाने शहापूर गावातील शेतकरी कुलदिप सिंह आणि धनकुमार, मदीनपूरचे शेतकरी रामकुमार व महिपाल, अलिपूर अटेरनाचे शेतकरी सतवीर सैनी व अजित यांच्या उसाची पाहणी केली. उसात किती प्रमाणात टॉप बोरर किड पसरली आहे, याचा आढावा घेतला. डॉ. वीरेश सिंह यांनी शेतकऱ्यांना अशी किडग्रस्त रोपे काढून टाकावीत, त्यांची पाने तथा किडलेला भाग नष्ट करावा असे सांगितले. पिकांना कलोरेन्ट्रेनीलीप्रोल कीटनाशक तसेच कोराजन अथवा फरटेरा हे किटकनाशक ४०० लिटर पाण्यात १५० मिलीलीटर इतके मिसळून फवारावे असे सांगितले. शेतकऱ्यांना इतर उपायांचीही माहिती देण्यात आली.