तेहरान : अन्नधान्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर साखर, पीठ, वनस्पती तेलाच्या बड्या शिपमेंटची देशाबाहेर होणारी तस्करी रोखल्याचे ईराणने स्पष्ट केले. बॉर्डर गार्ड कमांडर अहमद-अली गौदरजी यांनी सांगितले की, गेल्या ४५ दिवसांत समुद्र आणि जमिनीवरून सीमेवर तस्करांकडून जवळपास ५ टन आटा, ४ टन साखर, ६३ टन वनस्पती तेल नेण्यात आले आहे.
तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासात आवश्यक अन्नधान्याची साठेबाजू करणाऱ्या व्यवसायिकांकडून ३१२ टन आटा, २९० टन वनस्पती तेल जप्त करण्यात आला आहे. तेल निर्यातीच्या महसुलात वाढ झाल्याचा दावा सरकारने केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आहे. मात्र, अलिकडच्या आठवड्यांत किमती वाढल्या आहेत. आटा उत्पादक संघाच्या प्रमुखांनी सांगितले की, ईराणला २० मिलियनटन धान्य आयात करण्याची गरज आहे. यामध्ये ६ ते ७ मिलियन टन गव्हाचा समावेश आहे.
Home  Marathi  International Sugar News in Marathi  ईराण : साखरेसह इतर वस्तूंची देशाबाहेर होणारी तस्करी रोखली


