काहिरा : इजिप्तच्या न्यायालयाने साखरेत मीठ मिसळून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका साखर कारखान्याच्या मालकाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मीठ मिसळलेली साखर ग्राहकांना विकली जात होती. अल जैतूनच्या काहिरा जिल्ह्यात न्यायालयाने प्रतिवादीला ३०,००० इजिप्शियन पाऊंड (Dh6,028) दंड देण्याचाही आदेश दिला.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, अल यूम अल सबाने यास व्यवसायातील फसवणुकीचा विचित्र प्रकार म्हटले आहे. अनेक व्यापारी आणि सर्वसामान्य लोकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या की, त्यांच्या जिल्ह्यातील एका कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेच्या पॅकेटमध्ये मीठ मिसळलेले आहे. पोलिसांनी तपासणी केली असता मिठ मिश्रीत साखरेचे पोते सापडले. ते जप्त करण्यात आले. पोलिसांनी संशयित कारखान्यावर छापा टाकला आणि मालकास अटक केली. त्यानंतर त्याच्यावर फसवणुकीचा खटला चालविण्यात आला.














