नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या ११ व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ मे रोजी सिमला येथून देशातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीतील ११ वा हप्ता जारी करतील. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांकडून वसुली आणि लिस्टमधील नावे कमी करण्याची प्रक्रियाही सध्या सुरू आहे. त्यामुळे पीएम किसान २०२२ च्या नव्या लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही याची तपासणी करावी. तुम्ही घरी बसूनही आपला मोबाईल, लॅपटॉप अथवा कम्प्युटरवरुन आपल्या गावातील यादी पाहू शकता.
याबाबत लाईव्ह हिंदूस्थानने दिलेल्या वृत्तानुसार मोदी सरकार वार्षिक ६००० रुपये तीन हप्त्यात देते. एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च असे तीन हप्ते दिले जातात. यावर्षीचा पहिला हप्ता ३१ मे पासून येऊ लागेल. याची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला प्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जावे लागेल. तेथे Payment Success या टॅबखाली तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल. तेथे Dashboardवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. तेथे Village Dashboardमध्ये तुम्हाला गावाची पूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी आधी राज्य, जिल्हा, तहसील आणि गाव निवडावे. त्यानंतर पुढील बटणावर क्लिक करा. स्वतःबद्दल जाणून घ्यायचे असेल तर बटणावर क्लिक करा. Village Dashboard च्या खाली चार बटण आहेत. जर तुम्हाला किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले हे जाणून घ्यायचे असेल तर Data Received यावर क्लिक करा. जर प्रलंबित यादी जाणून घ्यायची असेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक करावे.











